Tuesday, March 15, 2016

Arth leuni pahile akshar | Guru Thakur | Marathi Kavita

अर्थ लेउनी पहिले अक्षर

अर्थ लेउनी पहिले अक्षर
कधी उमटले कळले नाही,
करी घेतला वसा न चुकला
पाउल मागे वळले नाही

सुन्न खिन्न कातर एकांती
सोबत माझी अक्षर झाले
थिजलो जेव्हा सभेत भरल्या
तिथेही धावून अक्षर आले
कुठ्ला हा अनुबंध म्हणावा?
कोडे मजहे सुटले नाही

होऊन अश्रू कधी ओघळ्ले
कधी सांत्वने घेउन आले
रणरणत्या मध्यान्ही वेडा
मेघ होऊनी भिजवून गेले
आली गेली कैक वादळे
विण नात्यांची टिकली नाही

गेली उलटुन युगे अता त्या
अनुबंधासही अंकुर फुटले
प्रश्न अताशा पडे जगाला
मी कुठला अन अक्षर कुठले
परस्परांतच असे मिसळ्लो
नुरले आता विरळे काही

गुरु ठाकूर

Reference: guruthakur.in

2 comments:

  1. नमस्कार. ..... ...... ....

    नवाकाळ वृत्तपत्रातून "दंवबिंदू" कविता संग्रहाची वाखाणनी .....

    माझा "दंवबिंदू" कविता संग्रह - १६५ पाने मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील कविता - ( १०८ कवितांचा हार आणि २१ कवितांची जुडी असलेला ) प्रकाशीत झाला आहे. ८० रंगीत छायाचित्रावर आधारित काव्य-संग्रह जगतात प्रथमच. भारताचार्य प्रा, श्री सु.ग.शेवड़े यानी अभिप्राय लिहून शुभाशीर्वाद देऊन गौरवांकित केले आहे. "दंवबिंदु कविता संग्रह " निश्चित आवडेल.

    माझ्याकडून मागविल्यास माझी त्यावर स्वाक्षरी / सही मिळेल. सध्या अमेरिकेत ५५ प्रती उपलब्ध आहेत.

    अमेरिकेतील खास मराठी मंडळ सदस्यांसाठी घरपोच किंमत : US $ 21.00 Only. पुस्तक घरपोच आल्यावर पैसे पाठवा.

    Send your Postal Address, Cell No. by Email: shashivaze@gmail.com My Cell No.in US 678-665-2857

    आपला स्नेहांकित,
    कवी शशिकिरण वझे

    ReplyDelete
  2. नमस्कार. ..... ...... ....