Saturday, November 14, 2015

एक धागा सुखाचा (Ek Dhaga Sukhacha by Ga di Madgulkar)

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे

पांघरसी जरि असला कपडा
येसी उघडा जासी उघडा
कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे

मुकी अंगडी बालपणाची
रंगित वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे

या वस्त्राते विणतो कोण
एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे

__ग. दि. माडगूळकर

No comments:

Post a Comment