Show Mobile Navigation

Sunday, September 20, 2015

, , , ,

तू सप्‍तसूर माझे (Tu Saptsur Majhe)

Asha-KD - 8:30 PM
तू सप्‍तसूर माझे तू श्वास अंतरीचा
गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा

जागेपणी मी पाहिले ते सत्य सारे देखणे
माझे मला आले हसू आकाश झाले ठेंगणे
निमिषात सारे संपले हुंकार ये प्रीतिचा

तू छेडिता माझ्या मना तारा अशा झंकारल्या
माझ्या सवे येताच तू दाही दिशा गंधाळल्या
हे हासणे अन्‌ लाजणे हा खेळ ऊन-पावसाचा

अशोक पत्की

0 comments:

Post a Comment