निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे
झुबे लालसर ल्यावे कानी,
जरा शिरावे पदर खोवुनी
करवन्दीच्या जाळिमधुनी.
शीळ खोल ये तळरानातून
भण भण वारा चढणीवरचा,
गालापाशी झिळमिळ लाडिक,
स्वाद जिभेवर आंबट कच्चा.
नव्हती जाणिव आणि कुणाची,
नव्हते स्वप्नही कुणी असावे,
डोंगर चढणीवरी एकटे
किती फिरावे,उभे रहावे.
पुन्हा कधी न का मिळायचे ते,
ते माझेपण, आपले आपण,
झुरते तनमन त्याच्यासाठि
उरते पदरी तिच आठवण,
निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांची,
टपोर हिरव्या करवंदाची...
__ इंदिरा संत
-
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरि विणलासे मंगल तोरण...
-
धरित्रीच्या कुशीमधे बियबियाणं निजली, वर पसरली माती जशी शाल पांघरली बीय डरारे भूमीत सर्व कोंब आले वर, गहिवरल शेत जस अंगावरती शहार ऊनवार्याशी...
-
Kusumagraj - Vishnu Vaman Shirwadkar: (Born: 27 February 1912, Died: 10 March 1999 ) The famous Marathi poet in Indian literature. His play ...
-
आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंध...
-
Pu La Deshpande - Purushottam Laxman Deshpande. (Born: 8 November 1919, Died: 12 June 2000) थ्यंक्यु निळ्या तळ्याच्या काठावरचा बगळा एका अप...
-
मी फसलो म्हणूनी मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते कवितेच्या...
-
B S Mardhekar (Born: 1 December 1909, Died: 20 March 1956) Baal Sitaram Mardhekar ( बा.सी.मर्ढेकर ) was famous marathi poet. Marathi literat...
-
Kusumagraj - Vishnu Vaman Shirwadkar. (Born: 27 February 1912, Died: 10 March 1999 ) Song: He Surano Chandra Vha Movie or Album: Kusumagraj ...
-
Pu La Deshpande - Purushottam Laxman Deshpande. (Born: 8 November 1919, Died: 12 June 2000) एक होती ठम्माबाई एक होती ठम्माबाई तिला सोशल व...
-
B S Mardhekar (Born: 1 December 1909, Died: 20 March 1956) शिशिरागम शिशिरर्तुच्या पुनरागमे एकेक पान गळावया, का लागता मज येतसे न कळे उगाच रडा...
0 comments:
Post a Comment